‘भयसूचक भोंगे’ ही आता ‘सामाजिक फॅशन’ होत चालली आहे; ज्या गोष्टी अस्वस्थ करतील, त्यांना बाजूला सारावं वा त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं...
उच्च शिक्षणात (कदाचित जाणूनबुजून) ‘भयसूचक भोंग्यां’ची संख्या वाढत चालली आहे. आपली ‘आघातां’ची व्याख्या पसरट आणि सर्वसमावेशक बनत चालली आहे. युद्ध, सत्यघटना किंवा त्यांचं कथन/चित्रीकरण बाजूला सारलं जात आहे. समजा वंशवाद, नरसंहार, वस्त्यांचे अग्नी किंवा इतर कारणांनी झालेले विध्वंस, विनाश, नुकसान या समस्यांकडे विद्यार्थीही अभ्यासक्रमात डोळेझाक करायला लागले तर?.......